मोठी बातमी! दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, ११ जवान हुतात्मा

छत्तीसगढ : दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूरजवळ दि. २६ एप्रिल रोजी डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी आयईडी पेरली होती. या हल्ल्यात ११ जवान हुतात्मा झाले आहेत. माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे. मृतांमध्ये १० डीआरजी कर्मचारी आणि एका चालकाचा समावेश आहे.
नक्षलवादी घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “दंतेवाडा येथील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवादी कॅडरच्या उपस्थितीच्या माहितीवरून नक्षलविरोधी मोहिमेसाठी आलेल्या डीआरजी दलावर झालेल्या आयईडी स्फोटात आमचे १० डीआरजी जवान आणि एक चालक शहीद झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”