तरुण भारत लाईव्ह । २८ फेब्रुवारी २०२३। क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. येत्या २४ एप्रिलला सचिन तेंडुलकर ५०वा वाढदिवस साजरा करणार आहे. सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित मुंबई क्रिकेट असोसिएशन खास गिफ्ट देणार आहे. MCA कडून वानखेडे स्टेडियमवर सचिन यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबतची घोषणाही असोशियनने केली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ एप्रिलला सचिन तेंडुलकर ५०वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिम्मित मुंबई क्रिकेट असोसिएशन खास गिफ्ट देणार आहे. वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान केले जाऊ शकते. सचिन तेंडुलकरने भारताकडून २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत, त्याच्याकडे सर्वाधिक धावा (३४,३५७) आणि १०० शतके आहेत. सचिन वयाची 50 वर्ष पूर्ण करत असताना हा पुतळा उभारण्यात येणार आहे, ही नक्कीच त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावाने एक स्टँड वानखेडेवर आहे.
यावर सचिन तेंडुलकर म्हणाले की हे माझ्यासाठी एक छानसं सरप्राईज आहे. माझ्यासोबत जेव्हा ही कल्पना जेव्हा शेअर केली तेव्हा मी सरप्राईज झालो. माझ्या कारकिर्दीची सुरुवात इथे झाली. खूप आणि कधी ही न विसरणाऱ्या आठवणी इथे आहेत. त्याचसोबत सर्वात मोठा क्षण माझ्यासाठी होता तो म्हणजे वानखेडेमध्ये २०११ चा विश्वचषक जिंकला होता.