---Advertisement---

क्रिकेटला मॅच फिक्सिंगची कीड! दक्षिण आफ्रिकेच्या तीन माजी खेळाडूंना अटक

---Advertisement---

3 Ex South African Cricketers Arrested: दक्षिण आफ्रिकेच्या तीन माजी क्रिक्रेटपटूंना मॅच फिक्सिंगच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. साल 2015-16 टी-20 रामस्लॅम चॅलेंज स्पर्धेत मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

तीनपैकी एक खेळाडू हा 2014 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा भाग होता. या क्रिकेटपटूंवर गुन्हे अन्वेषण विभाग (DPCI) म्हणजेच हॉकमार्फत ही कार्यवाही करण्यात आली आहे. यात माजी क्रिकेटपटू इथी मोहालातीस (४३), थमी त्सोलेकीले (४४), लॉन्वाबो त्सोत्सोबे (४०) या खेळाडूंना अटक करण्यात आली आहे.

डीपीसीआयच्या गंभीर भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने ही अटक केली. हा तपास 2016 मध्ये एका व्हिसलब्लोअरने केलेल्या खुलाशांवर आधारित होता. थामी त्सोलेकिले आणि लोनावो त्सोत्बे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा, 2004 (PRECCA) अंतर्गत 5 गुन्ह्यांचा आरोप आहे. दोन्ही खेळाडू 29 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिटोरिया येथील विशेष व्यावसायिक गुन्हे न्यायालयात हजर झाले, जेथे या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.

गुलाम बोदी यांचेही नाव समोर
गुलाम बोदीने अनेक खेळाडूंशी संपर्क साधून तीन देशांतर्गत टी-20 सामन्यांच्या निकालांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. भारतीय बुकींच्या संगनमताने तो या कटाचा भाग होता.बोदीला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती आणि 2019 मध्ये त्याला आठ प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते, त्यानंतर त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या तिन्ही क्रिकेटपटूंची क्रिकेट कारकीर्द

अटक करण्यात आलेल्या तीन खेळाडूंपैकी फक्त लोनावो त्सोत्बे हा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा भाग आहे. त्याने 5 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2014 टी-20 विश्वचषक स्पर्धेत होता. त्याच वेळी, थामी त्सोलेकिले आणि एथी म्बलाती यांची कारकीर्द प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटपुरती मर्यादित होती.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment