मविआचा जागावाटपाचा फॉम्यूला ठरला ? आज होणार घोषणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत मोठी आघाडी घेतली असतांना दुसरीकडे मविआकडून अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे दोन फॉर्म्युले निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ होणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. दरम्यान, महायुतीमधील शिंदे गट  आणि अजित पवार गटातील पहिल्या यादीवर लक्ष लागून असून शिवसेना शिंदे गटाची पहिली लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे.

महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला सोडून 22-16-10 चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, महाविकास आघाडीनं जर वंचितला सोबत घेतलं, तर मात्र 20-15-9-4 यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेस पक्षाला 15, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9, वंचित बहुजन आघाडीला 4 जागा असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला शिवसेना गटाच्या कोट्यातून 2,  काँग्रेस पक्षाच्या कोटातून 1 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून 1 जागा देण्यावर पक्षांची तयारी असून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकीकडे लक्ष लागलं आहे.

हाताकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी शेतकरी स्वाभिमानी पक्षाला महाविकास आघाडी बाहेरून पाठींबा देणार आहेत. तर, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला, तर रामटेक जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. माढामधून रासपला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिली जाणार आहे. तसेच, भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला २२ जागा

  1. जळगाव
  2. बुलढाणा
  3. यवतमाळ वाशीम
  4. हिंगोली
  5. परभणी
  6. छत्रपती संभाजीनगर
  7. धाराशिव
  8. शिर्डी
  9. नाशिक
  10. ठाणे
  11. कल्याण
  12. पालघर
  13. मुंबई उत्तर पूर्व
  14. मुंबई दक्षिण
  15. मुंबई दक्षिण मध्य

16. मुंबई उत्तर पश्चिम

  1. उत्तर मुंबई
  2. रत्नागिरी सिंधुदुर्ग
  3. रायगड
  4. सांगली
  5. हातकणंगले (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा)
  6. मावळ

काँग्रेसला 16 जागा

  1. पुणे
  2. नंदुरबार
  3. धुळे
  4. नागपूर
  5. अमरावती
  6. भंडारा
  7. चंद्रपूर
  8. गडचिरोली
  9. जालना
  10. नांदेड
  11. लातूर
  12. उत्तर मध्य मुंबई
  13. कोल्हापूर
  14. सोलापूर
  15. अकोला
  16. रामटेक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 जागा

  1. शिरूर
  2. सातारा
  3. बारामती
  4. माढा
  5. रावेर
  6. दिंडोशी
  7. अहमदनगर
  8. बीड
  9. वर्धा
  10. भिवंडी