---Advertisement---

Weather Update : सावधान ! खान्देशातील ‘या’ शहराचे तापमान 40 अंश पार, पारा आणखी वाढणार, IMD चा इशारा

---Advertisement---

Weather Update :  वर्षाच्या सुरुवातीपासूनच हवामानात मोठे बदल झाले असून, फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे जाणवत आहे. दिवसाढवळ्या उन्हाचा चटका बसू लागला असून, पहाटे आणि रात्री गारवा जाणवत आहे. अशातच पुन्हा

मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमानाने 40 अंशांचा टप्पा गाठला आहे. नंदुरबारमध्ये कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले आहे. पुण्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 35 ते 38 अंशांपर्यंत गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कराडमध्येही 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. संपूर्ण राज्यात उन्हाचा जोर वाढत चालला आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतात घनदाट धुके होते. मात्र, आता वातावरण स्वच्छ झाल्याने सूर्यकिरणांचा तीव्र प्रभाव जाणवतो. हवामानातील बदलामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली असून, याचा थेट परिणाम तापमानाच्या वाढीवर झाला आहे.

सामान्यतः होळीच्या सणानंतर उन्हाचा चटका वाढतो, परंतु यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यातच तापमानाने उच्चांक गाठला आहे. याशिवाय चक्रीवादळाचा धोका वाढल्याचेही हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. दक्षिण भारतातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानातील चढ-उतार अधिक तीव्र झाले आहेत.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाच्या पुणे विभाग प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा अधिक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विविध शहरांतील तापमानाची नोंद दिली आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment