मुंबई : कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्तीय भागातील कर्नाटकातील नागरिकांनी मतदानासाठी जाता यावे यासाठी या भागात भरपगारी सुट्टी जाहिर केली आहे. हा आदेश कोल्हापुर,सांगली , सोलापूर , सिंधुदूर्ग , उस्मानाबाद, लातूर , नांदेड या जिल्ह्यातील कामागारांना लागू होणार आहे. तसेच हा आदेश शासनाच्या कामगार विभागाच्या अख्यारित येणाऱ्या सर्व सरकारी घटकांना बंधनकारक आहे. त्यामुळे कर्नाटकात जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच एकनाथ शिंदे हे कर्नाटकात भाजपाच्या प्रचारासाठी ६ आणि ७ मे रोजी कर्नाटक दौरा करणार असल्याची शक्यता आहे.त्याचबरोबर कर्नाटकात घट्ट पाय रोवण्यासाठी भाजपाने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.त्यात महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड हे नेते देखील प्रचाराकर्ता कर्नाटकात जाणार आहेत.