---Advertisement---
जळगाव : सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च, जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रासाठी मध्यस्थी हि विषेश मध्यस्थी मोहीम सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेेवा प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत राबविण्यात येत आहे. या मोहीमेअर्तंगत न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणे विषेश मध्यस्थी मोहीमेव्दारे निकाली काढण्यात येणार आहे. तसेच या मोहीमेअर्तगत न्यायालयातील प्रलंबित असलेली तडजोड पात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत व ती प्रकरणे मध्यस्थी अंर्तगत तडजोडीने मिटावीत, अषी ज्यांची इच्छा आहे अषा पक्षकारांची प्रकरणे या विषेश मध्यस्थी मोहीमेअर्तंगत तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
---Advertisement---
संबंधीत पक्षकार प्रत्यक्ष अथवा आभासी पध्दतीने यात सहभागी होऊ शकतात. तडजोडीसाठी पक्षकारांनी जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालय, तसेच न्यायालयाच्या आवारातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव याठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राघिकरणाचे सचिव पवन एच.बनसोड यांनी केले आहे
पक्षकारांना नामी संधी
न्यायालयांमध्ये बरेच प्रलंबित आहे अषी प्रकरणे राश्ट्रासाठी मध्यस्थी या विषेश मध्यस्थी मोहीमेच्या माध्यमातून तडजोडीतून मिटविता येतील, यामुळे पैसा, श्रम आणि वेळेचीही बचत होते. मध्यस्थी मोहीमेच्या माध्यमातून सुलभ, जलद न्याय मिळतो. त्यामुळे पक्षकांरानी या संधीचा लाभ घ्यावा, अषे आव्हान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.क्यु. एस. एम. शेख यांनी केले आहे.