जळगाव : माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी पाचोरा येथे त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. शिवसेना फुटल्यानंतर उध्दव ठाकरे प्रथमच जळगाव जिल्ह्यात येणार असल्याने या सभेची ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरु आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या दौर्याचे स्वागत केले आहे मात्र त्याचवेळी खासदार संजय राऊत यांना इशाराही दिला आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
उद्धव ठाकरे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ आर ओ तात्यांचे माझ्यावर उपकार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत येत असतील तर त्यांचे स्वागत मात्र त्यांनी चौकटीत बोलावं. तसं पत्र मी एसपींना देणार आहे. संजय राऊत सारखा माणूस माझ्याविषयी बोलणार असेल तर सभेत घुसेल असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे.