बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश; या राशींवर होणार सकारात्मक परिणाम

तरुण भारत लाईव्ह । १२ मे २०२३।  चंद्रानंतर सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह म्हणजे बुध. वक्री अवस्थेत उदय झालेल्या बुध ग्रह 15 मे पासून मार्गी होणार आहे. तसेच 7 जूनला संध्याकाळी 7 वाजून 44 मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करते. सध्याच्या स्थितीचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मिथुन रास 
या काळात उत्पन्नात चांगली वाढ होईल. कुटुंबातील मोठी व्यक्ती किंवा भावाचा सहकार्य मिळेल. बॉससोबत संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या.

कर्क रास 
या काळात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. नवी नोकरी स्वीकारण्यासाठी गोचर अनुकूल आहे. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. जमीनीशी निगडीत प्रकरणं निकाली लागतील.

सिंह रास 
या राशीच्या नवम भाव म्हणजेच भाग्य स्थानात बुध ग्रह गोचर करणार आहे.  या तुमच्या हातून दानासारखं पुण्याचं काम होईल. प्रवासाचा योग जुळून येईल.

तूळ रास 
या राशीच्या सप्तम भावात म्हणजेच वैवाहिक भावात बुध गोचर आहे.  नवे करार या काळात निश्चित होऊ शकतात.