तरुण भारत लाईव्ह ।१८ फेब्रुवारी २०२३। राशीचक्रात प्रत्येक ग्रह आपल्या भ्रमण कालावधीनुसार राशी बदल करत असतो. या ग्रहांचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम होत असतो. आता बुध ग्रह 27 फेब्रुवारीला शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या स्थितीचा तीन राशींना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना बुध ग्रह शुभ फळे देणारा ठरणार आहे. या लोकांची कित्येक दिवसांपासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील. तसेच यांच्या मान – सन्मानात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी मंडळींना आर्थिक लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ रास
या राशीच्या व्यक्तींना हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. व्यापारी मंडळींना आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी ही वेळ योग्य आहे.
तूळ रास
बुध गोचर आणि ग्रहांची स्थिती तूळ राशीच्या पाचव्या स्थानात होत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं प्रेम या काळात मिळू शकतं. तसेच जोडीदारासोबतचे संबंध या काळात आणखी दृढ होण्याची शक्यता आहे. तसेच संपत्ती आणि वाहन खरेदीसाठी योग्य वेळ आहे. आर्थिक लाभ संभवतात. तुमचे आणि मुलांचे आरोग्य चांगले राहील.