जळगाव : सरस्वती ग्रुपच्या सरस्वती एमजी मोटर्स, जळगाव शोरूममध्ये एमजी मोटर्सच्या अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार एमजी विंडसर ईव्ही प्रोचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम जळगाव-भुसावळ महामार्गावरील शोरूममध्ये मंगळवारी (13 मे) पार पडला. या कार्यक्रमाला सरस्वती ग्रुपचे संचालक मुकेश टेकवानी व धवल टेकवानी यांच्यासह अनेक मान्यवर, ग्राहक, मित्र परिवार व वाहनप्रेमी उपस्थित होते.
एमजी विंडसर ईव्ही प्रो तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्सचा उत्तम संगम
धवल टेकवानी यांनी शुभारंभप्रसंगी बोलताना सांगितले की, भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. एमजी विंडसर ईव्ही प्रो हे वाहन त्याच्या अपग्रेडेड फिचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे ठरते. यात 52.9 क्षमतेची बॅटरी असून एका चार्जमध्ये सुमारे 449 कि.मी. अंतर पार करता येते. विशेष म्हणजे, या वाहनाच्या बॅटरीवर 15 वर्षांची लाइफटाइम वॉरंटी (अटी व शर्ती लागू) देण्यात आली आहे. वाहनामध्ये लेवल-2 (डास फिचर्स ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंन्स सिस्टीम) ही अद्ययावत आहे , ऑटोमॅटिक स्पीड कंट्रोल, लेन किप असिस्ट, स्वयंचलित डिक्की आणि इतर वाहनांना चार्ज करण्याची “व्हेइकल टू लोड” (2) सुविधा देण्यात आली आहे. जी भारतात प्रथमच सादर केली गेली आहे.
ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद
एमजी विंडसर ईव्ही प्रोच्या आकर्षक डिझाईन, प्रगत वैशिष्ट्ये आणि दमदार परफॉर्मन्समुळे ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
सरस्वती ग्रुप उत्तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित व विश्वासार्ह उद्योग समूह आहे. 1951 साली दिवंगत तुलसीदास टेकवानी यांनी सुरू केलेल्या दुधाच्या व्यवसायातून आज सरस्वती डेअरी, सरस्वती फोर्ड, सरस्वती एंटरप्रायझेस आणि सरस्वती एमजी अशा यशस्वी उपकंपन्यांपर्यंत प्रवास केला आहे. सध्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व धवल टेकवानी करत आहेत. तुलसीदास टेकवानी यांच्या पहिल्या पिढीने लावलेल्या रोपाचे आज एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
जळगावात ‘एमजी विंडसर ईव्ही प्रो’चे दमदार पदार्पण,पहिल्याच दिवशी 50 हून अधिक कारची बुकिंग
