---Advertisement---

MI vs KKR : तुषाराचा कहर, 2 षटकात 3 बळी

---Advertisement---

आज आयपीएल 2024 च्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. मुंबई इंडियन्ससाठी ही शेवटची संधी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ सतत संघर्ष करत आहे आणि आज जर ते हरले तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची 1% आशा देखील संपुष्टात येईल. दरम्यान, कोलकाताचे २ षटकार ३ विकेट गेले आहेत.

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरही बाद झाला असून यावेळीही तुषाराला यश मिळाले आहे. रघुवंशी आणि अय्यर एकाच षटकात बाद झाले.

नुवान तुषारानेही दुसरी विकेट घेतली आहे. त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात अंगक्रिश रघुवंशीची विकेट घेतली.
पहिल्याच षटकातच बाद झाल्यानंतर फिल सॉल्ट माघारी परतला. नुवान तुषाराला ही विकेट मिळाली.

कोलकाताकडून फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी फलंदाजीला सुरुवात केली आहे.
मुंबई संघ प्रथम गोलंदाजी करत आहे, त्यामुळे माजी कर्णधार रोहित शर्माला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. फलंदाजी करताना तो प्रभावशाली खेळाडू म्हणून येईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment