आयपीएल 2024 स्पर्धेच्या 55 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या या सामन्यातून अंशुल कंभोज पदार्पण करत आहे. तसेच या सामन्यातून हैदराबाद संघात मयंक अगरवालचे पुनरागमन झाले आहे. त्याला हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.