आर्या फाउंडेशनच्या मदतीने मिलन पोपटानी ‘डॉक्टर’ बनले

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील पांडे डेअरी चौकातील ते गरीब कुटुंब, आईचा शिवणकाम आणि ब्युटीपार्लरचा छोटा व्यवसाय वडील वेळेनुसार छोटी-मोठी कामे करून संसाराचा रहाटगाडा ओढतात आणि कुटुंबातील विजिगीषू वृत्तीचा मुलगा, मिलन हा डॉक्टर होण्याच्या जिद्दीने नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून, 2018 मध्ये उत्तीर्ण झाला. परंतु मीलनच्या एम.बी.बी.एस.च्या शिक्षणचा ‘प्रवेश शुल्क’ अडथडा ठरत असल्याने शहरातील नेत्रतज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी आपल्या आर्या फौंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासाठी मिलनला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी प्रथम वर्षाचे शिक्षण शुल्क 78 हजार, दुसर्‍या वर्षाचे शुल्क, 1 लाख 30 हजार 20, एमबीबीएस च्या तिसर्‍या वर्षीच्या पहिल्या सत्राचे शुल्क रु 86 हजार 600 रुपये, एमबीबीएस च्या तिसर्‍या वर्षीच्या दुसर्‍या सत्राचे शुल्क 86 हजार 60 अशी आजवर शासकीय फी आर्या फाउंडेशनद्वारा भरण्यात आली. त्यामुळे मिलन पोपटाणी हा नायर हॉस्पिटल मुंबई मध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेऊ शकला.

 

मदतीचे मिलन ने केले चीज

डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या प्रयत्नांनी आर्या फौंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक आणि मानसिक मदतीचे चीज करीत मीलन पोपटाणी हा प्रथम वर्ष एम.बी.बी.एस.मध्ये 76.33 टक्के गुण तर दुसर्‍या वर्षी 80.18 टक्के गुण मिळवित उत्तीर्ण झाला आहे. पहिल्या आणि दुसर्‍या वर्षीच्या सर्व विषयात मिलन हा विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाला हे विशेष. तिसर्‍या वर्षाच्या प्रथम सत्रात देखील मिलनला 75.25 टक्के गुण मिळाले. तिसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या सत्रात 74.11 टक्के मार्क्स मिळवत मिलन ने एम.बी.बी.एस.उत्तीर्ण केले.

 

आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

आपला मुलगा डॉक्टर झाल्याने मिलनच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. आर्या फौंडेशनच्या मदतीमुळेच मुलगा डॉक्टर झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आर्या फाउंडेशन नी मला केलेली मदत मी विसरणार नाही. संस्थेचे हे कार्य वाढविण्यासाठी यापुढे मी देखील आर्या फाऊंडेशनला मदत करीत राहील.

– डॉ. मिलन पोपटाणी, जळगाव

 

हुशार आणि होतकरु विद्यार्थी केवळ पैश्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये हा संस्थेचा उद्देश आहे, मीलन भविष्यात जळगावातील नामांकित डॉक्टर होईल यात शंका नाही.
– डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फौंडेशन