---Advertisement---

नंदुरबारमध्ये काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

---Advertisement---

नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथील नागरिकांना रविवारी दुपारी १२.५४ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दरम्यान, मध्यप्रदेश राज्यातील बडवानी येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल एवढी नोंद करण्यात आली आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये 
शहादा तालुक्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असतील. मात्र भूकंपाचा केंद्रबिंदू हा मध्यप्रदेश येथील बडवाणी असून येथिल धार, आलीराजपुर या जिल्ह्यांमध्ये शहरात व ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. येथे नागरिकांनी भयभीत होऊ नये, त्याचप्रमाणे अफवांवर विश्वास ठेवू नये. भूकंपाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. झालेल्या भूकंपाच्या केंद्र बिंदू हा मध्यप्रदेश येथील बडवाणी आहे. जिल्हा प्रशासन सर्व वडामोडींवर लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले.

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment