पौष्टिक व स्वादिष्ट दुधी भोपळ्याची खीर रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ११ एप्रिल २०२३। दुधी भोपळा आणि दूधापासून बनवली जाणारी साधीसोपी गोड डिश म्हणजे ‘दुधी भोपळ्याची पौष्टिक खीर!’ जर तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर ही खीर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
1.2 लीटर दूध, 1 कप दुधी भोपळा, 1.4 कप साखर, 2 चमचे खोया, 1 चमचे तूप, 1 चमचे चिराउंजी, 1 चमचे बदाम, 1 चमचे पिस्ता, 1 चमचे हिरवी वेलची

कृती 
सर्वप्रथम एक दुधी चांगला किसून घेऊन त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णत: काढून घ्या. नंतर, एका पॅनमध्ये २ चमचे साजूक तूप घेऊन त्यामध्ये २ ते ३ मिनिटे ताजा किसलेला दुधी परतून घ्या. आता पॅनमध्ये अर्धा लीटर दूध घालून उकळवून घ्या. जेव्हा दूध घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यामध्ये साखर घालून २ मिनिटे शिजवून घ्या. आता मिश्रणात खवा घालून २ मिनिटे शिजवून घ्या. आता त्यामध्ये चारोळी, बदामाचे व पिस्त्याचे काप आणि वेलची पावडर घालून ५ मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. तयार झाली आहे आपली पौष्टिक व स्वादिष्ट दुधी भोपळ्याची खीर!