milk union : जळगाव जिल्हा दूध संघाचा गोड निर्णय ; विकास गोल्ड इतक्या रुपयाने स्वस्त

milk union : जळगाव जिल्हा सरकारी दूध उत्पादक संघ मर्यादित जळगाव निर्मित म्हशीचे विकास गोल्ड दूध सोमवार 22 जानेवारी पासून प्रति लिटर 2 रुपयाने स्वस्त केले.दूध संघाने रविवार 21 रोजी हा निर्णय घेत त्याची अमंलबजावणी सोमवार 22 पासून सर्वत्र केली.

यासाठी विकास दूधाला मागणी
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ ही शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची एक विश्वासाची सहकारी संस्था म्हणून लौकीक प्राप्त आहे. ताजे तसेच अतिशय उत्तम दर्जाचे असल्याने विकास दूध हे ग्राहक आवडीने खरेदी करतात. ग्राहकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन दूध संघाचे चेअमरन आमदार मंगेश चव्हाण तसेच कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी निवेदनातून केले आहे.