---Advertisement---

Anil Patil : मंत्री अनिल पाटलांची अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट; महसूल विभागांना दिल्या ‘या’ सूचना

---Advertisement---

अमळनेर : तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली. तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागांना दिल्या. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार, तलाठी, कर्मवीर व ग्रामस्थ उपस्थित होते.

तालुक्यातील अनेक गावांसह शिरूड परिसरात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी दिली. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार, तलाठी, कर्मवीर व ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील शिरूड, लोंढवे, निसर्डी, वाघोदे येथे दि 17 जून रोजी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

यासंदर्भात मंत्री ना अनिल पाटील यांनी आधीच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्याजयश्री अनिल पाटील यांनीही वरील गावांमध्ये भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर मंत्री पाटील हे मुंबई येथून अमळनेर येथे येताच त्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन समस्त शेतकऱ्यांना धीर दिला व लवकर पंचनामा करून शासकीय मदत मिळऊन देण्याची हमीही दिली.यावेळी माजी सभापती श्याम अहिरे,प्रा सुरेश पाटील, लोंढवे सरपंच अशोक पाटील,बन्सीलाल भागवत,योगेश भागवत यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment