---Advertisement---

मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंसह थत्तेंवर ठोकला अब्रूनुकसानीचा दावा

---Advertisement---

जळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, खडसेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून जिल्ह्याभरात निषेध करण्यात आला होता. आता मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर भाजप कार्यकर्त्यांकडून जिल्ह्याभरात निषेध करण्यात आला होता. तसेच खडसेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

कोणतेही सबळ पुरावे न देता एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांनी गंभीर आरोप केलेय. त्यामुळे जनमानसात प्रतिमा मलिन झालीय. आता या विषयी कोर्टातच लढणार असून आपल्या वकिलाच्या माध्यमातून एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांच्याविरोधात अब्रु नुकसानीची नोटीस दिली आहे.

खडसेंच्या नोटीस आली नसल्याचा दावा

मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या वकिलाच्या माध्यमातून अब्रु नुकसानीची नोटीस दिली असल्याचा दावा केला आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे खडसेंनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment