जळगाव जिल्हयातील कृषी प्रश्नांबाबत मंत्री रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यातील पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या 6686 शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप प्रलंबित आहे. हा लाभ तात्काळ मिळावा, यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेतली.

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन 2022 मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होणेसाठी तत्कालीन कृषिमंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती.

समितीकडे पिक विम्याचा लाभ नाकारलेल्या 11022 शेतकऱ्यापैकी 8190 शेतकऱ्यांनी दाद मागितली असता, समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या 6686 शेतकऱ्यांना पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळणे बाबत आज “केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेतली.

तसेच जळगांव जिल्हा हा महाराष्ट्रात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेत असून, केळी साठी आवश्यक सुपिक जमीन एकूण जवळजवळ १ लाख हेक्टर येथे उपलब्ध आहे. जिल्ह्यातील केळीची अनेक देशात मागणी असल्याने जळगांव जिल्ह्याचा फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम (हॉर्टीकल्चर क्लस्टर) च्या प्रायोगिक टप्प्यात समावेश होणेबाबत देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे मागणी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---