---Advertisement---
जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली.
या प्रकरानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे यांनी मुलीसह महिलांना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी त्यांनी मंत्र्यांच्याच मुलीची छेड होत असेल इतरांचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
टवाळखोर तरुणांविरोधात आधीच पोलिसांत तक्रारी
ही टवाळखोर पोरं सराईत गुन्हेगार असून, त्याविरोधात आधीच पोलिस ठाण्यात तक्रारी गेलेल्या आहेत. आरोपींमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. अनेकदा मुली पुढे येत नाहीत. मात्र आपणच पुढे आलं पाहिजे. म्हणूनच ती तक्रार करण्यासाठी गेली आहे. आपल्या मुलीचं नाव येऊ नये असं पालकांना वाटतं. अखेर नाइल झाल्याने त्यांना तक्रार करण्यासाठी जावं लागलं,” असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.
महिला आयोगाकडून दखल
या प्रकरणाची दखल घेत, या टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना मुक्ताईनगर पीआयला दिल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिलीय.









