संतापजनक ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् केला अत्याचार, अल्पवयीन गर्भवती; चोपड्यातील घटना

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला २१ वर्षीय मजनूने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन पीडीता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, ऑक्टोबर 2024 पासून गावातील ज्ञानेश्वर उर्फ दादू सुनिल भील (21) याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिल्याने, पिडितेने संबंधी प्रकार तिच्या नातेवाईकाला सांगितला. यानंतर संबंधित तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.

रिक्षा उलटून एकाचा मृत्यू

शिरसाळा मारुतीच्या दर्शनाला जाताना रिक्षा उलटून योगेश ज्ञानेश्वर मंगळकर (३०, रा. नवी दाभाडी, ता. जामनेर) याचा मृत्यू झाला. मंगळकर परिवार मारुतीच्या दर्शनाला एमएच-१९- बीयू-४६०७ या रिक्षाने जात होते. शनिवारी ही घटना अरिहंग जिनिंगजवळ घडली. या घटनेत योगेश याचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले असून, जखमींवर बोदवड रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment