धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून अत्याचार; बाळाला दिला जन्म

जळगाव : जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने  अत्याचारातून बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील भादली गावात मध्यप्रदेशातील झिरण्या येथील एक कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्याला आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयित चमासिंग बिलाला (२२) याने अत्याचार केला.

या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.

कॅफेआड अश्लील चाळे, २२ तरुण-तरुणींना पकडले

धुळे : शहरातील देवपूर परिसरातील कॅफेंमध्ये तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यास मुभा दिली जात असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गुरुवार, ३० रोजी स्वतः उपस्थित राहून धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण पाच पथकांद्वारे दहा कॅफेंची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान डी. लाईट कॅफे, शाईनिंग कॅफे, रॉयल लॉज, विथ यू कॅफे, शुगर कॅफे या ठिकाणी तब्बल २२ तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळले, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

विद्यार्थी व कॅफे मालकांना पोलीस ठाण्यात हजर

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांसह कॅफे चालक व मालकांना देवपूर पोलीस ठाण्यात नेले. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. तसेच, कॅफे मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांचा समावेश होता. याशिवाय जिविशा शाखेच्या निकिता महाले, महापालिकेच्या आयुक्त अनिता दगडे पाटील तसेच आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पोलीस पथकानेही कारवाईत सहभाग घेतला.

शहरात खळबळ, कॅफे चालकांवर कारवाईची मागणी

या घटनेनंतर शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून, अशा प्रकारच्या कॅफेंवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पालकांमध्येही संतापाची भावना आहे. पोलिसांनी यापुढेही अशी कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.