---Advertisement---
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय नराधमाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही माहिती उघडकीस आली. या प्रकरणी निखिल कोळी (२०, रा. आसोदा रोड) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील १५ वर्षीय मुलगी शिक्षण घेत असून, तिच्याशी निखिल कोळी याने ओळख निर्माण केली. त्यानंतर, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तो तिच्या घरी येत राहिला.
दरम्यान, त्याने स्वतःच्या घरी आणि मुलीच्या घरी तिच्यावर अत्याचार केला. यातून ती पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
---Advertisement---
या प्रकरणी निखिल लीलाधर कोळी (२०, रा. आसोदा रोड) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून, त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
एक वर्षापासून करत होता अत्याचार
गेल्या एक वर्षापासून हा तरुण स्वतःच्या घरासह मुलीच्या घरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता. यातून ती पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.