उत्तर प्रदेश : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर पीडितेला जबरदस्तीने गोमांसही खाऊ घातले. शिवाय पीडितेवर ऍसिड ओतून तिच्या हातावरील ओमचा टॅटू पुसण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये ही संतापजनक घटना समोर आली आहे. पीडितेच्या मावशीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २ जानेवारी रोजी तिची १४ वर्षीय भाची मार्केट रोडमार्गे टेलरच्या दुकानात गेली होती.
दरम्यान, त्यांच्याच गावातील चार तरुणांनी भाचीचे अपहरण केले. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडितेला जबरदस्तीने गोमांसही खाऊ घातले. शिवाय पीडितेवर ऍसिड ओतून तिच्या हातावरील ओमचा टॅटू पुसण्यात आला.
फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, भाची बेपत्ता झाल्यापासून ते तिचा शोध घेत होते. दरम्यान, दोन महिन्यांनी २ मार्च रोजी पीडित मुलगी भयानक अवस्थेत घरी परतली आणि आई-वडिलांना तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला.
या प्रकरणी कुटुंबीयांनी भगतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. चौघांपैकी एकाला अटक करण्यात आली असून,
अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.