---Advertisement---
जळगाव : मुख्याध्यापकांना भाऊ असल्याचे सांगून एकाने अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तौसिफ जहाबाद तडवी (वय २२, रा. पाल, ता रातेर) यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून, त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पीडित मुलगी भुसावळ येथील रहिवासी असून ती शहरातीलच एका शाळेत शिक्षण घेते. ७ ऑगस्ट रोजी संशयित तडवी याने शाळेत येऊन मुख्याध्यापकांना लेखी अर्ज देत मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगितले.
मख्याध्यापकांची दिशाभल करून त्याने मुलीला सोबत घेतले व मुंबई, चोपडा आणि जळगाव येथे नेले. ९ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी रात्री आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर काही तासातच पोलिस पथकाने आरोपीस यातल परिसरातन अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता आरोपीस १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.