---Advertisement---
जळगाव : पुढे हल्ला झाला असून आपल्याकडील दागिने काढून ठेवा, असे सांगत तोतया पोलिसांनी वाकोद येथील महिलेचे दागिने घेऊन पोबारा केला. या दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चातुर्मास सुरू असल्याने कुंदनबाई जैन या दररोज वाकोद येथून पहूर येथील जैन स्थानकात दुचाकीवरून ये-जा करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे येत असताना वाकोद ते पहूरदरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एका बुलेटवर दोन तोतयांनी जैन यांना देऊन थांबविले.
आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी करीत पुढे हल्ला झाल्याने अंगावरील दागिने काढून डिक्कीत ठेवून द्या, असे तोतया पोलिसांनी जैन यांना सांगितले. त्याप्रमाणे जैन यांनी अंगावरील १५ ग्रॅम वजनाची चैन, तीन तोळे वजनाची लांब पोत काढून डिक्कीत ठेवली.
यादरम्यान दोन्ही भामट्यांनी महिलेला भुरळ पाडून दागिने लंपास केले. याच ठिकाणी जैन यांचा मुलगा कल्पेश यांना मारहाण करून २०१८मध्ये लाखोंचे दागिने लंपास करण्यात आले होते.