”साहेब, आमचा मुलगा बेपत्ता आहे”, आई-वडिलांची तक्रार अन् शेजारच्याच घरात… घटनेनं खळबळ

---Advertisement---

 

भुसावळ, प्रतिनिधी : आपला सहा वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) आई-वडिलांनी केल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला, मात्र पत्ता लागला नाही. अखेर शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) घराशेजारी असलेल्या एका बंद घरात त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. यावल शहरातील बाबूजी पुराभाग ही घटना घडली. दरम्यान, शहरातील वातावरण पाहता दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवासी हन्नान खान (वय ६) हा मजीद खान यांचा मुलगा शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेपासून बेपत्ता असल्याची तक्रार आई-वडिलांनी केली. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान, अखेर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर एका कोठीत जळालेल्या अवस्थेत मिळून आला.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली व घटनास्थळी प्रचंड जमाव एकत्र झाला. जमावास शांत करण्याकरीसाठी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, शरद कोळी, सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले.

फॉरेन्सिक पथक दाखल

फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून शहरात सध्या तणावाचे वातावरण असल्याने बाबुजी पुरा भागात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---