मुक्ताईनगर : चिनावल येथील बेपत्ता तरुणाची मुक्ताईनगरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सातोड शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात मंगळवारी उघडकीस आली. रवींद्र मधुकर पाटील (46) असे मयताचे ाव आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
दगडाने ठेचून केली हत्या
मुक्ताईनगर शहराजवळील सातोड शिवारातील बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर नाल्यात रवींद्रचा मंगळवारी मृतदेह आढळला. मारेकर्याने चेहर्यावर मोठ्या प्रमाणावर दगडाचे वार केले तसेच डोक्यावर टणक वस्तूने प्रहार केल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा यंत्रणेला संशय आहे.
दोन दिवसांपासून तरुणाचा सुरू होता शोध
चिनावल येथील रवींद्र पाटील हा प्रौढ चिनावलच्या पुरूषोत्तम महाजन ग्रामीण पतसंस्थेत यापूर्वी मॅनेजर म्हणून कार्यरत होता मात्र सुमारे दहा वर्षांपूर्वी पतसंस्था डबघाईस गेल्यानंतर पतसंस्थेशी संबंधित कामे तो करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. यापूर्वी रवींद्रचे दोन विवाह झाले असून दोन्ही पत्नी त्याच्यापासून विभक्त राहतात तर सुमारे पाच वर्षांपूर्वीच रवींद्रने रत्नागिरी येथील महिलेशी विवाह केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महिलेपासून रवींद्रला अडीच महिन्यांचा दादू नामक मुलगा आहे. रविवार, 4 जून रोजी रवींद्र हा दुचाकीवरून बाहेर पडला मात्र दोन दिवस घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यूची बातमी चिनावलमध्ये धडकल्यानंतर खळबळ उडाली.
पोलीस अधिकार्यांची धाव
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, परीविविधीन डीवायएसपी सतीश कुलकर्णी, प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे, पोलीस कर्मचारी व फॉरेन्सिक पथकाने धाव घेत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला असून बुधवारी तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मयताचा योगेश मधुकर पाटील (40, चिनावल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.