---Advertisement---

निंबादेवी धरणात बेपत्ता तरुणाचा २४ तासानंतरही शोध लागेना, धुळ्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण !

---Advertisement---

जळगाव : यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळील निंबादेवी धरणात रविवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या जळगाव येथील जतीन अतुल वारडे (वय १८) या तरुणाचा २४ तास उलटूनही शोध लागलेला नाही. अंधारामुळे सोमवारी सायंकाळी शोधमोहीम थांबवण्यात आली. या तरुणाच्या शोधासाठी आज मंगळवारी धुळे येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

रामेश्वर कॉलनीतील जतीन हा आपल्या सात मित्रांसह रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी दुचाकीने निंबादेवी धरणावर आला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जतीन अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडाला. तेंव्हापासून तो बेपत्ता आहे.

सोमवारी सकाळपासून पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली सावखेडासिम पोलिस पाटील पंकज बडगुजर, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार वासुदेव मराठे, अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांच्या पथकाने दिवसभर धरणावर तळ ठोकला. स्थानिक तीन तरुण आणि मारुळ येथील एका वृद्धाच्या मदतीने पाण्यात शोध घेण्यात आला, परंतु सायंकाळपर्यंत जतीन हाती लागला नाही. घटनास्थळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी भेट दिली.

२४ तास उलटूनही लागला नाही शोध


जतीन अतुल वारडे (वय १८) या तरुणाचा २४ तास उलटूनही शोध लागलेला नाही. अंधारामुळे सोमवारी सायंकाळी शोधमोहीम थांबवण्यात आली. या तरुणाच्या शोधासाठी आज मंगळवारी धुळे येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---