ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यांना 4-4 संघ असे दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान असून टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी आता काहीच दिवस शिल्लक असताना दुखापतीमुळे एक खेळाडू स्पर्धेबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित संघाला मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा : कॅफेआड अश्लील चाळे, २२ तरुण-तरुणींना पकडले
दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्खियानंतर आता ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर मिचेल मार्श देखील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. आयसीसीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मार्श हा ऑस्ट्रेलियाचा टी20I संघाचा कर्णधार आणि एक महत्त्वाचा बॅटिंग ऑलराउंडर आहे. त्याच्या अनुपस्थितीचा संघावर मोठा परिणाम होणार आहे. एक ऑलराउंडर हा दोन खेळाडूंच्या तोडीचा मानला जातो, त्यामुळे मार्शच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, अद्याप त्याच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.
मिचेल मार्श हा संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू असून त्याने गेल्या काही वर्षांत आपल्या अष्टपैलू खेळाने अनेक महत्त्वाच्या विजयात योगदान दिले आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाला नव्या रणनीती आखाव्या लागणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ
कर्णधार : पॅट कमिन्स
यष्टीरक्षक : ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस
फलंदाज : ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ
ऑलराउंडर : मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅट शॉर्ट, आरोन हार्डी
गोलंदाज : नॅथन एलिस, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, ॲडम झॅम्पा
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध असेल आणि मार्शच्या जागी कोणाची निवड होईल, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दुखापतीमुळे होणारे बदल संघाच्या रणनीतीवर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा तगडा झटका मानला जात आहे.