उपवासाची मिसळ रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ८ मे २०२३। उपवासाला सारखं साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाऊन कंटाळा आला असेल तर आज संकष्टी चतुर्थीला बऱ्याच लोकांचा उपवास असतो. उपवासाच्या दिवशी उपवासाची मिसळ तुमची घरी ट्राय करू शकता. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
साबुदाण्याची खिचडी (वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या प्रमाणात करावे. शेवटी लिंबाचा रस मिसळावा) १ लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेणे, काकडी किंवा कोशिंबीर, खारे दाणे १ लहान वाटी, साखर, कोथिंबीर, १ मोठी वाटी दही.

कृती 
सर्वप्रथम हे सर्व पदार्थ तयार करून ठेवावे. प्रत्येकाच्या बशीत खिचडी घालून ती बशीत पसरावी. त्यावर २-४ चमचे खारे दाणे, त्यावर तितकाच तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर डावभर दही, त्यावर ३-४ चमचे काकडी चव, कोथिंबीर हे सर्व पदार्थ पेरावेत. चवीपुरती साखर पेरावी. खाणार्‍याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत.