---Advertisement---
फैजपूर (ता. (ता. यावल) : रावेर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला.
शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका सरकारची असली तरी, कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या पत्रव्यवहारात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होते. यामुळे नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो,” असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले.
जून-जुलै २०२३ मध्ये झालेल्या वादळात अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, संबंधितांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, तसेच २९ जून २०२५ रोजी झालेल्या वादळात सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे मागणी केली की, या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
जिल्ह्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी
जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी ८१ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सात लाख ४० हजार ५३६ हेक्टर आहे. त्यापैकी आजअखेर सहा लाख सहा हजार ९२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण ८१.९६ टक्के आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच दमदार व नंतर तुरळक ते म ध्यम स्वरूपात पाऊस झाला. जूनमध्ये झालेल्या पावसाची सरासरी १००.३ मिलिमीटर नोंद झाली आहे. तुरळक ते मध्यम पावसामुळे काही ठिकाणी खरीप वाणांची लागवड काहीअंशी रखडली होती. तीदेखील या पावसामुळे निम्म्यावरून ८१ टक्क्यांवर पोहोचली आहे. आता शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला असून, शेतशिवार गजबजलेली दिसून येत आहेत. जिल्ह्यातील मोठ्या धरणांतही चांगला जलसाठा झाला आहे