---Advertisement---
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खामखेडा येथील भूमी अधिग्रहण यातील घोळाबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वातावरण चिघळले असून, पोलिसांनी शेतकऱ्यांसह आमदार पाटील यांना अटक केल्याने, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून इंदूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. दरम्यान, यात खामखेडा येथील शेतकऱ्यांना भूमी अधिग्रणाचा योग्य मोबदला न मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात आमदार चंद्रकांत पाटील देखील सहभागी झाले होते.
दरम्यान, वातावरण चिघळल्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांसह आमदार पाटील यांना अटक केली असून, त्यांना ताब्यात घेऊन भुसावळ तालुका पोलीस स्थानकात आणले जात असल्याचे वृत्त आहे.
ठेकेदाराची दादागिरी
दरम्यन, काही दिवसांपूर्वी या कामाच्या ठेकेदाराने दादागिरी करत शेतकऱ्यांच्या केळीमध्ये जेसीबी घालून ते पीक जमीनदोस्त केली आणि काम सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली होती. यानंतर देखील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते.