MLA Chimanrao Patil : पारोळाकरांसाठी खुशखबर, काय आहे?

जळगाव : पारोळा शहराचा सर्वांगीण विकासासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी भरीव निधी आणला आहे. शहरातील अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमिंमध्ये अत्यावश्यक सुविधा तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या, शहरात विद्युत रोषणाई व्हावी, एकप्रकारे इतर शहरांप्रमाणे पारोळा शहराचा देखील कायापालट व्हावा, यासाठी आमदार चिमणराव पाटील यांचे प्रयत्न असून अखेर त्यांना यश आले आहे. विशेषतः पारोळाकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

शहराचा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी. यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. शहरात सुरु असलेल्या पाईपलाईनचे काम देखील आज पावेतो ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातच आता नव्याने ५ कोटीच्या विकासकामांची भर पडली आहे. या निधीच्या माध्यमातून प्रामुख्याने शहरातील धरणगाव रोड लगत असलेल्या जागेत धोबी समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणेसाठी ३५ लक्ष, पारोळा शहरातील महादू आप्पा नगर भागात असलेल्या जागेत नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणेसाठी ३५ लक्ष, पारोळा शहरातील सोमेश्वर महादेव चौकाचे सुशोभीकरण करणेसाठी ५० लक्ष, पारोळा शहरातील गोसावी समाजाच्या दफनभूमीला सुशोभीकरण करणेसाठी ३५ लक्ष, पारोळा शहरातील धुळे रोड लगत असलेल्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासह इतर विकासाभिमुख कामे करण्यासाठी १ कोटी, पारोळा शहरातील श्रीभवानीगड परिसरात सभागृहाच्या बांधकामासाठी २० लक्ष, पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ लागून असलेल्या भगवान नथ्थू नगर भागातील खुल्या जागेच्या सुशोभीकरणासाठी २५ लक्ष, पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ला लागून असलेल्या अमळनेर चौफुली परिसर सुशोभीकरण करणेसाठी ५० लक्ष व पारोळा शहरातील विविध भागांत विद्युतीकरण करणेसाठी १.५० कोटी या कामांचा समावेश आहे.

या मंजूर कामांत धोबी, नाभिक व गोसावी समाजाला पूर्णपणे न्याय मिळाला असून आमच्या सारख्या छोट्या समाजांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचे या समाजांतर्फे आभार व्यक्त केले जात आहेत. तसेच या विकासकामांना लवकरच सुरुवात करणार असून शहरातील प्रत्येक घटकाला असाच न्याय देणार असून शहराच्या विकासात कुठलीही बाब अपूर्ण पडू देणार नसल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले आहे.