MLA Disqualification Case : राज्याच्या राजकारणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपत्रातसंदर्भात निर्णय देणार आहेत. या निर्णयातून कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार, हे कळणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Former Chief Minister Prithviraj Chavan यांनी यासंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ”घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवे, आजचा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल.. घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा १९८५ मध्ये आला होता. या कायद्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या कायद्याला बदल व्हायला हवेत.”
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, १६ आमदारांना अपात्र केलं पाहिजे, ही कायदेशीर बाब झाली. पण विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात आणि ते त्या पक्षाचे हित बघणार नाहीत, अशी अपेक्षा असते. या निकालाला १.५ वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
चव्हाण म्हणाले की, आजच्या निकालातून १६ आमदार अपात्र ठरले तर भाजपला नेतृत्वबदल करायला संधी मिळेल किंवा १४ आमदार अपात्र ठरले तर त्या निकालाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ. राज्यामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत
१६ आमदार जर अपात्र झाले आणि त्यांचे पद गेले तर राजकीय भूकंप होईल
विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांना भेटायला गेलेलं मी कधी याआधी पाहिलं नाही
चुकीचा पायंडा पाडला गेला आहे
जर निकाल वेगळा आला तर आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागणार आहोत
भाजपला नेतृत्व बदल करायचा असेल तर त्यांच्याकडे आज संधी आहे