आमदार अपात्रता सुनावणी : सभागृहात नेमकं काय झाले?

मुंबई :  शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जातेय. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभूंची उलटतपासणी घेत आहेत. 2019 च्या निवडणुकीत आपण काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रचारात टीका केली होती का असा सवाल जेठमलानींनी केला. त्यावर आपण आपल्या मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो त्यामुळे तशी वेळ आली नाही असं प्रभू म्हणाले. दरम्यान इंग्रजी याचिकेवरून शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू  यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.  सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांना अध्यक्षांनी खडसावलं. व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी तीन वेळा फेटाळूनही आपण ती वारंवार का करत आहात असा सवाल अध्यक्ष नार्वेकरांनी केला.

ठाकरे गटाने आज कागदपत्रं सादर केली. शिंदे गटाने मात्र कागदपत्रं सादर करण्यास वेळ मागितला. ठाकरे गटाच्या वकिलांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंच्या साक्षीचं वाचन केलं. प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रं ठाकरे गटाने सादर केली.

21  जून 2022 ला मनोज चौघुले यांनी शिंदेंचे पीए प्रभाकर काळे यांना पाठवलेल्या व्हॉट्सअॅपचा मेसेज अध्यक्षांनी रेकॉर्डवर घेतलाय. तसंच मुंबईत शिवसेना विभाग प्रमखांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्रही अध्यक्षांनी रेकॉर्डवर घेतलंय. त्याशिवाय  2 जुलै 2022 ला इमेलद्वारे व्हीपबाबत पाठवलेल्या आदेशाची कॉपीही अध्यक्षांनी रेकॉर्डवर घेतलीय.

 

सभागृहात नेमकं काय झाले? 

जेठमलानी : प्रभू तुम्ही या अपात्रता याचिका इंग्रजीत दाखल केल्यात का?

 

प्रभू: मी याचिका दाखल केलीय, मराठीत‌ माझ्या वकिलाला सांगितलं, त्यांनी इंग्रजीत ड्राफ्ट करुन दिलंय.

 

जेठमलानी: आपण अपात्रता याचिकांत कुठेही म्हटले नाहीकी तुम्ही जे सांगितले आहे, ते मराठीत तुम्हाला सांगितले आहे.

 

प्रभू : मी जसे काही म्हटले आहे ते रेकॉर्डवर आहे. (मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची प्रभू यांची मागणी)

 

अध्यक्ष: पिटीशन ड्राफ्ट करताना ते आपल्याला मराठीत समजवण्यात आलं आहे अस कुठे ही म्हटल नाही यावर प्रभु तुमचं मत काय आहे?

 

प्रभू:  मला जेव्हा समजल तेव्हाच मी सही केली असे म्हटलं आहे.

 

अध्यक्ष :  (शिंदे गटाच्या वकिलांनी विचारलेला प्रश्न मराठीत अध्यक्ष सांगताना) तुम्हाला इंग्रजी वाचता येत का आणि ते समजत का?

 

प्रभू :  मला इंग्रजी भाषा वाचता येते आणि समजते. मात्र मला माझ्या भाषेत समजते. त्या संदर्भात मी कांन्फडन्ट आहे.

 

जेठमलानी : अपात्रता याचfका सही करण्याच्या आधी तुमच्या वकिलाने इंग्रजीत वाचून दाखवली होती का?

 

प्रभू:  मला वाचून दाखवल्यानंतर मी शब्दशा त्याचा अर्थ मराठीत समजून घेतला.

 

जेठमलानी : तुम्हाला कोणत्या वकिलांनी अपात्रता याचिकेतील मुद्दे मराठीत समजवले.

 

प्रभू :असिम सरोदे यांनी समजवले.

 

जेठमलानी: तुम्ही या व्यासपीठासमोर जे प्रतिज्ञापत्र इंग्रजी भाषेत सादर केले आहे. 18 नोव्हेंबर २०२३ रोजी तुम्ही जे शपथपत्र सादर केले, ते सुद्धा इंग्रजीत आहे हे सत्य आहे का?

 

प्रभू :  हो खरं आहे ते रेकॉर्डवर आहे.

 

जेठमलानी: आपल्या शपथपत्रात कुठेही उल्लेख नाही की ते आपल्याला मराठीत समजवण्यात आलं नव्हतं.

 

प्रभू : ते ऑन रेकाॅर्ड आहे.

 

जेठमलानी: प्रतिज्ञापत्रावरील मुद्दे न समजून घेत आपण सही केली आहे का?

 

प्रभू: असे कसे शक्य आहे? विधीमंडळाचा मी सदस्य आहे. मी लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मी समजून घेतल्याशिवाय कशी सही करणार नाही. मी अशीक्षित नाही.  माझ्या भाषेत मला समजत म्हणून मी माझ्या भाषेत समजून घेऊन त्यानंतर मी सही केली आहे.

 

ठाकरे गटाच्या वकिलांचा आक्षेप घेत असे प्रश्न विचारु नयेत असे म्हटले

 

जेठमलानी: तसे नाही चालणार मी विचारणार

 

जेठमलानी: 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या युतीत आपण निवडणूक लढवली होती का?

 

प्रभू : मला शिवसेना माझ्या पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. त्यावर मी निवडणूक लढलो. शिवसेना पक्षाच्या चिन्हावर मी निवडणूक लढलो.

 

कामत (ठाकरे गटाचे वकील ) : हे प्रश्न गैर आहेत. जे सर्वांना माहिती आहे ते प्रश्न उलट तपासणीत का विचारत आहे? वेळ वाया घालवत आहेत.

 

कामत : शिवसेना पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली त्यापूर्वी भाजपसोबत युती केली होती हे सत्य आहे का?

 

प्रभू: हो सत्य आहे.

 

कामत : तुम्ही निवडणूक लढवताना विरोधात असणाऱ्या काँग्रेस तसेच इतर पक्षांवर आरोप प्रत्यारोप केले हल्ले होते का?

 

प्रभू : मी विकासाची काम केली होती. त्याच कामांच्या आधारे मी जनतेकडे मत मागितली.  त्यामुळे कोणावर टीका करायची माझ्यावर वेळ आली नाही.

 

जेठमलानी: राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या नेत्यांवर आपण निशाणा साधलाच  नाही असो आहे का?

 

प्रभू :  मी विकासाच्या मुद्यावर प्रचार केला त्यामुळे माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारावर बोलण्याची वेळच आली नाही.

 

जेठमलानी : आपण किंवा आपल्या पार्टीने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला केला का?

 

प्रभू: मी माझ्या मतदार संघात विकासाच्या मुद्यावर प्रचार केला. मागील पाच वर्षात काय केल? आणि पुढे काय करणार यावर प्रचार केला. त्यामुळे मला माझ्या विरोधी उमेदवारावर टीका करण्याची वेळच आली नाही.

 

जेठमलानी : निवडणूक प्रचारात भाजप आणि शिवसेना सरकारने जी विकास कामे केली त्याचा उल्लेख केला का?

 

प्रभू : मी माझ्या मतदारसंघात मी केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला.

 

जेठमलानी: प्रचारात मोदी, शहा आणि फडणवीस यांचा फोटो पोस्टरवरती फोटो वापरला का?

 

प्रभू : मला या संदर्भात फार आठवत नाही. मात्र पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो होता.

 

जेठमलानी : प्रभू तुम्ही 2019 च्या निवडणूक प्रचारात अनेक पोस्टर छापले. त्यात पीएम मोदी , शाहा , फडणवीस या नेत्यांची पोस्टर वापरले हे खरे आहे का?

 

प्रभू : पोस्टरवर काय छापले मला आठवत नाही. युती होती. माझ्या पोस्टरवर सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे पोस्टर मात्र नक्की होते.