---Advertisement---
जळगाव : भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची संघटनात्मक जिल्हा बैठक बुधवारी जी. एम. फाउंडेशन येथे उत्साहात पार पडली. बैठकीत सेवा पंधरवाडाचे प्रदेश सहसंयोजक आमदार मंगेश चव्हाण यांनी सेवा पंधरवाडा विषयी माहिती दिली. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. त्यांनी पक्ष शिस्त, संघ भावना व परस्पर सहकार्य या त्रिसूत्रीवरच आगामी निवडणुकांमध्ये काम करायचे आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ना. गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात पक्ष संपूर्ण शक्तीने पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे ही यावेळी नमूद केले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात खा. स्मिता वाघ यांनी कार्यकर्त्यांनी सातत्याने पक्षाचे काम करीत राहिले पाहिजे. राजकारणात संधी मर्यादीत असल्या तरी योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी देण्याचे काम भारतीय जनता पार्टीमध्ये होत असते. ज्यांना संधी मिळाली नाही. त्यांचाही विचार आगामी काळात पक्ष नेतृत्व निश्चितपणे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले की, सांस्कृतिक राष्ट्रवाद, राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, सकारात्मक सर्वधर्म समभाव, अंत्योदय, मूल्य आधारित राजकारण या भाजपच्या विचारधारेवर गाढ विश्वास ठेवून काम करायचे आहे. या बैठकीत राज्य परिषद सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
नवीन जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्षांना नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा आरक्षण संदर्भात घेतलेल्या निर्णयासाठी अभिनंदनाचा ठराव राष्ट्रीय परिषद सदस्य पोपटतात्या भोळे यांनी मांडला. याप्रसंगी मा.आ. महेंद्रसिंग पाटील व मा.आ.दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
---Advertisement---
सेवा पंधरवाडा सप्ताह कार्यक्रम नियोजनाची माहिती सरचिटणीस कपिल पाटील यांनी तर सोशल मिडिया अॅप्पची माहिती सरचिटणीस कन्हैया रायपूरकर यांनी दिली. प्रास्ताविक सरचिटणीस अमोल नाना पाटील यांनी केले. तर सरचिटणीस राजेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्षा मनोरमा पाटील यांनी आभार मानले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे सर्व राज्य परिषद सदस्य, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते.