---Advertisement---

धक्कादायक; अजित पवार गटाच्या आमदाराचा रोहित पवारांबाबत गौप्यस्फोट

---Advertisement---

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून मोठं भाष्य केलं आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन खासगी कर्मचारी काम करू शकतात, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवारांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तेत सामील होण्यासाठी सर्वात आधी रोहित पवारांनीच समर्थन दिलं होतं, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दादा, आपण राजकारणात अजून लहान आणि नवखे आहात. ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता सरकारला सरकारचे काम करू द्या आणि स्वतःला सावरा.”

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment