---Advertisement---

MLA Chandrakant Raghuvanshi : आदिवासी विकास विभागाच्या 114 कोटींच्या कथित गणवेश खरेदीची चौकशी करा!

---Advertisement---

नंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत 114 कोटींची कथित गणवेश खरेदीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात १० हजार गाईंचे वाटप झाले असून, त्यापैकी १ गाय सुद्धा दूध देत नसल्याच्या आरोप रघुवंशींनी गुरुवारी विधान परिषद सभागृहात केला.

आदिवासी विकास विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या ११४ कोटींच्या गणवेश खरेदी प्रकरण तापायला सुरुवात झालेली आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते,आ. एकनाथराव खडसे यांनी देखील या मुद्द्यावरून सभागृहात आवाज उठवला होता. त्यानंतर विधान परिषद आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील या प्रकरणात उडी घेत प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

याबाबत आ.चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करतांना म्हणाले,नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न हे आदिवासी विकास विभागाच्या खात्याशीच निगडित असतात. आदिवासी विकास विभागामार्फत 114 कोटीची गणवेश खरेदी संशयस्पद केलेली आहे.१ कोटी पेक्षा जास्त रकमेची निविदा दर कराराप्रमाणे प्रमाणे खरेदी करू नये असा शासनादेश असताना ११४ कोटींची खरेदी दर कराराप्रमाणे केली आहे.

एकीकडे उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाने आदिवासी विकास विभागाला एफिडेविट सादर करायचे आदेश असतांना विभागाचे अधिकारी न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नाहीत. अधिकाऱ्यांनी एफिडेविट केलं नसल्याने न्यायालयाने १०० हजारांच्या दंड देखील ठोकलेला आहे. दहा हजार गाईंची नंदुरबार जिल्ह्यात लाभार्थ्यांना वाटप झाले. त्यापैकी एक गाय देखील दूध देत नाही. आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडल्यानंतर उपसभापती राम शिंदे यांनी आदिवासी विकास विभागाला निर्देश दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment