Nandurbar News : शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नुकतीच विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. आमदार झाल्यानंतर त्यांचे प्रथमच शनिवारी (२२ मार्च) शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढून सुभाष चौकात सायंकाळी पाचला नागरी सत्कार व शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सभा घेण्यात येणार आहे.
आमदार रघुवंशी विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांनी मुंबईत नुकतीच विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. शनिवार (२२ मार्च) सायंकाळी पाचला त्यांचे शहरातील धुळे चौफुलीवर स्वागत करण्यात येऊन मिरवणूक काढण्यात येईल.
धुळे चौफुली, मोठा मारुती मंदिर, नाट्यमंदिर परिसर, अंधारे चौक, आम दार कार्यालयामार्गे मिरवणूक सुभाष चौकात येईल. तेथे सायंकाळी सातला जाहीर सभाहोईल. सभेत आमदार रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांचा नागरी सत्कार होईल.
दरम्यान, असंख्य समर्थकांनी स्वागताचे बॅनर झळकविले आहेत. कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गेल्या २ ते ३ दिवसांपासून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे.