धुळे: अवकाळी वादळ व पाऊसामुळे धुळे तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय स्तरावरून पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असण्याची ग्वाही धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र (राम ) भदाणे ( MLA Ram Bhadane) यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.
जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गहू, हरबरा, कांदा काढणीवर आले होते. यांचे नुकसान झाले आहे. नेर परिसरात गारपीट मुळे फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातले पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मका खाली पडला आहे. शुक्रवारी आमदार राम भदाणे यांनी शासकीय महसूल व कृषी विभाग यंत्रणा सोबत नेर, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराणे, देऊर,उभंड, नांद्रे, भदाणे, शिरधाने, सैताळे, लामकानी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहणी केली.
या वेळी आ. भदाणे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई प्राप्त करून देण्यासाठी पक्ष कटीबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार राम भदाणे यांनी दिली. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना अधिकाऱ्यांना आ. भदाणे यांनी दिल्या आहेत.
या वेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव,माजी जि.प.अध्यक्षा धरतीताई देवरे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, जिल्हा ऊपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,अजय माळी,संजय सैंदाणे,मनिषा ताई खलाणे,ज्योती ताई,अर्जुन गायकवाड,तुषार महाले,भाऊसाहेब देवरे,जगदिश देवरे,सागर देवरे,शरद पाटील,चुडामण महाले,गोटु अमृतसागर,गुलाब बोरसे,नाना वाघ,राजेंद्र परदेशी, तहसीलदार अरूण शेवाळे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी,तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश,बोराडे साहेब,भास्कर जाधव,मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिवदे,पर्यावेक्षक बोरसे, कृषी सहायक चेतन शिंदे, सर्कल समाधान पाटील ,तलाठी मयूर सोनवणे, आर. डी. माळी, साहेबराव माळी, रतिलाल पाटील, वसंत माळी,एम एस ई बी चे अधिकारी पोलिस पाटील विजय देशमुख, रतिलाल वाघ, तुषार महाले, सुदाम महाजन, सागर तलवारे, सोनू बागुल, गुलाब धनगर, बापू पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आगीत ८ म्हशी व ६ पारडू यांचा होरपाडून मृत्यू
दरम्यान, आनंदखेडे येथील पितांबर फकिरा पाटील यांचे शेतातील गोठा मध्ये आग लागली होती. या आगीत ८ म्हशी व ६ पारडू यांचा होरपाडून मृत्यू झाला होता. या आगीत लाखों चारा, ढेप आदी वस्तू जळून खाक झाले होते. यात लाखों रुपयांचे नुकसान झाले होते. दरम्यान आमदार राम भदाणे यांनी शेतकरी पितांबर पाटील यांची भेट घेतली. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाईसाठी तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.