शरद पवार गटातील आमदारांचा अजितदादांसोबत जाण्याचा आग्रह

मुंबई : राष्ट्रवादीतील दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवारांनी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना सोबत घेवून शरद पवारांविरुध्द बंड पुकारले. यांनतर राष्ट्रवादीत अजित पवारांना मानणारे आमदार त्यांच्यासोबत सत्तेत गेले. मात्र काही आमदार शरद पवारांसोबत कायम राहिले. मात्र शरद पवारांसोबत राहिलेले आमदारही आता अजितदादांसोबत जाण्याचा आग्रह धरत असल्याची माहिती आहे. या आमदारांकडून शरद पवारांना सत्तेत सहभागी होण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

शरद पवारांची समजूत घालून त्यांना सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न अजित पवारांसह इतर नेत्यांचा आहे. तर पवारांसोबत असलेले आमदार आपण या नेत्यांसोबत गेले पाहिजेत. विकासासाठी सत्तेत सहभागी व्हायला हवं असं त्यांना वाटते. भविष्यात सत्तेत राहून लोकांची कामे करता येईल असा आग्रह आमदारांचा आहे.

रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यासारखे नेते शरद पवारांसोबत आहेत. मात्र अजित पवार आणि इतर राष्ट्रवादी नेते नसल्याने राज्यात पक्ष संघटनेला उभारी देण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण पुन्हा सगळे एकत्र आले पाहिजे. पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहिला पाहिजे असं या आमदारांना वाटते.