नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने तक्रार घेवून आलेल्या मुलीच्या पालकांना अर्वाच्य भाषेचा वापर केला. पोलिस निरीक्षकाच्या या वागणुकीच्या निषेदार्थ मुलीच्या पालकांसह आमदार रस्त्यावर उतरले आहे. दरम्यान, सदर पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.
अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नुकतेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी त्यांच्या दालनात तालुक्यातील सरपंच व गेल्या काही दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या मुलीचे पालक आले होते. त्यांना अर्वाच्य भाषा वापर करत चांगली वागणुक दिली नाही. यामुळे या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे; अशी मागणी होत आहे.
दरम्यान, २५ फेब्रुवारी पोलिस निरीक्षक बुधवंत यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल करावा; या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर शेवाळी नेत्रंग महामार्गावर विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आणि मुलींचा पालकांनी रस्ता रोको करत नाराजी व्यक्त केली.