Mobile Use Tips For Kids : हल्ली मुले मोबाईलशिवाय जेवतही नाहीत. मोबाईल हिसकावून घेतला तर ते रडू लागतात, अश्या अनेक तक्रारी पालकांकडून होत आहेत. अनेक अहवालांमधून असे दिसून आले आहे की, मोबाईलच्या व्यसनामुळे काही मुले लठ्ठदेखील झाली आहेत. चिडचिडेपणा, चिंता, ताण यासारख्या समस्या देखील लहान वयातच उद्भवू असल्याचे काही अहवालांत समोर आले आहे. त्यामुळे यातून मुलांची सुटका करण्यासाठी पालक अनेकदा मुलांना मारहाण करतात, परंतु ही पद्धत चुकीची आहे. लहान मुलांना मोबाईल पासून सुटका करण्यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यातून तुम्ही मुलांची मोबाईल पासून सुटका सुरु शकाल. चला जाणून घेऊया काय आहेत या टिप्स.
पालकांनी फोनचा वापर कमी करावा
मुल लहान असताना ते आजूबाजूच्या लोकांना पाहून काही गोष्टी शिकतात. अशा परिस्थितीत, जर पालक दिवसभर फोनवर व्यस्त असतील तर मुलाची उत्सुकता देखील वाढते आणि त्याला फोन वापरण्याची इच्छा देखील होते.
मुलाला समजावून सांगा
जर तुम्हाला मुलाची फोनची सवय सोडायची असेल तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा की फोन वापरणे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
त्यांना क्रियाकलाप करायला लावा
मुले आग्रह धरल्यावर फोन देण्याऐवजी त्यांच्यासोबत खेळा. त्यांना नवीन सर्जनशील क्रियाकलापांमध्ये गुंतवा. जसे की चित्रकला, संगीत, नृत्य, योगा, खेळ. यामुळे केवळ मोबाईलचे व्यसन सुटणार नाही तर ते मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील सर्वोत्तम पर्याय आहे.
वेळापत्रक बनवा
मुल उठल्यापासून ते झोपेपर्यंत दिवसभरात काय काय करेल याची वेळ ठरवा. यामुळे मुलाला संपूर्ण दिवस कसा वापरायचा हे देखील कळेल. या वेळापत्रकात त्यांच्या झोपण्याची, खाण्याची, खेळण्याची आणि अभ्यासाची वेळ निश्चित करा. त्यानंतर, त्यांना दिवसातून फक्त २० ते ३० मिनिटे फोन दाखवा.
मुलांच्या जवळ फोन ठेवू नका
मुलांच्या जवळ फोन ठेवू नका. फोन त्यांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना फोन वापरण्याचा मोह कमी होईल. रात्री, फोन मुलांच्या जवळ ठेवला जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. ते तुमच्या देखरेखीपासून दूर फोन वापरत नाहीत याची खात्री करा. म्हणून, फोन मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा जेणेकरून त्यांना तो मिळू शकणार नाही.