मोदी सरकारने घेतला कॉंग्रेसला धक्का देणारा सर्वात मोठा निर्णय; वाचा काय आहे

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने कॉंग्रेसला धक्का देणारा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. केंद्राने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यांनी पोस्ट केले, “25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून, हुकूमशाही मानसिकतेचे प्रदर्शन करून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. लाखो लोकांना कोणतीही चूक न करता तुरुंगात टाकण्यात आले आणि प्रसारमाध्यमांचा आवाजही कमी करण्यात आला. 1975 च्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या महान योगदानाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने भाजप विरोधात प्रचार करताना संविधान बदलण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यामुळे इंडिया आघाडी आणि काँग्रेसला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक यश मिळाले. तर, भाजपचे संख्याबळ घटले. लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले. राहुल गांधी यांनी सदस्यत्वाची शपथ घेताना संविधानाची प्रत हाती घेऊन शपथ घेतली होती. मात्र, त्यांच्या या आरोपांना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेऊन एक प्रकारे उत्तरच दिले आहे.