पाकिस्तानमध्ये विकासाचे मोदी मॉडेल; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पहिल्या मुख्यमंत्री तथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियन नवाज यांनी आता विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी विकासाचे नवीन मॉडेल जाहीर केले आहे. मरियन नवाज यांनी मांडलेला विकास आराखडा पीएम मोदींच्या आर्थिक धोरणांशी मिळतीजुळती असल्याचा दावा केला जात आहे.

मरियन यांनी निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या विजयी भाषणात पंजाबचा विकास आराखडा मांडला. स्मार्ट शहरे, आर्थिक उपक्रम, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ आणि रस्त्यांचे जाळे, आरोग्य व्यवस्था, मरियम यांना ​​त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात ज्या गोष्टी लागू करायच्या आहेत. पंजाबला आर्थिक केंद्र बनवण्यासाठी मी धोरणे तयार करणार असल्याचे त्यांनी भाषणात म्हटले होते. पीओकेमधील निर्वासित मानवाधिकार कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी नवाज यांच्या विकास मॉडेलची तुलना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक मॉडेलशी केली आहे.

अमजद अयुब मिर्झा म्हणाले, इथे प्रश्न असा आहे की नोकरशाही आणि राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांना पंजाबमध्ये जे मॉडेल तयार करायचे आहे ते कसे यशस्वी होईल. लष्करी-औद्योगिक संकुलाला, लष्कराच्या व्यवसायाचा सामना कसा करणार? खासगी क्षेत्राच्या वाढीमुळे ते खूश होणार नाहीत. पंजाबचा प्रत्येक प्रदेश मजबूत लष्करी अर्थव्यवस्थेने प्रभावित आहे, असंही मिर्झा म्हणाले.