---Advertisement---

देशातील ‘१०० पॉवरफुल’च्या यादीत मोदी नं १

---Advertisement---

नवी दिल्ली : इंडियन एक्सप्रेस ग्रुपने भारतातील टॉप १०० पॉवरफुल्ल व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून याही यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या नंबरवर आहेत. तर, देशाचे गृहमंत्री अमित शहांचा दुसरा नंबर लागतो. या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी १५ व्या क्रमांकावर असून अरविंद केजरीवाल हे १६ व्या स्थानी आहेत. या यादीत ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा हे १८ व्या स्थानी आहेत.

देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे ४ थ्या स्थानावर आहेत. संघ प्रमुख मोहन भागवत (६), मुकेश अंबानी (९), ममता बनर्जी (१३), नीतीश कुमार (१४), टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन (२२), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (२३) व्या स्थानी आहेत. गौतम अदानी (३३), स्मृति ईरानी (३७), तेजस्वी प्रसाद यादव (४०) व्या स्थानी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांचे खास असलेल्या काही नेत्यांचा यात समावेश आहे. त्यानुसार, एस जयशंकर (६८), नितिन गडकरी (६५), अश्विनी वैष्णव (५२), किरेन रिजिजू (५१) व्या स्थानी आहेत. तर, एनएसए अजीत डोभाल (७८) व्या स्थानी आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण ९७ व्या स्थानावर, ९८व्या नंबरवर लुलु ग्रुपचे चेअरमन यूसुफ अली, ९९व्या क्रमांक वर आलिया भट्ट आणि १०० व्या स्थानी रणवीर सिंग आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment