---Advertisement---

खुशखबर ! मान्सून केरळच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या महाराष्ट्रात कधी होणार दाखल ?

---Advertisement---

नवी दिल्ली : प्रखर उन्हाचे चटके सहन करीत असलेल्या देशवासीयांना भारतीय हवामान खात्याने मंगळवारी सुखद बातमी दिली. अंदमानात दाखल झाल्यानंतर झपाट्याने प्रगती करीत असलेला मान्सून पुढील चार ते पाच दिवसांमध्ये केरळात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

यापूर्वी हवामान खात्याने केरळात २७ मेपर्यंत मान्सून दाखल झालेला असेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, सध्या मान्सून ज्या गतीने प्रगती करीत आहे, ती पाहता तो २४ किंवा २५ मे पर्यंत केरळात दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

अपेक्षित कालावधीत मान्सून केरळात दाखल झाल्यास २००९ नंतर प्रथमच मान्सून निर्धारित वेळेच्या आधी दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल. २००९ मध्ये मान्सूनचे केरळात २३ मे रोजी आगमन झाले होते.

मान्सूनसाठी सध्याची परिस्थिती अतिशय पोषक आहे. केरळच्या दिशेने त्याची वेगाने वाटचाल सुरू आहे, असे हवामान खात्याने आज दुपारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

साधारणपणे मान्सूनचे केरळात १ जून रोजी आगमन होत असते आणि त्यानंतरच्या आठ दिवसांच्या कालावधीत तो महाराष्ट्रात दाखल होऊन ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश आपल्या कवेत घेत असतो. २७ सप्टेंबरपासून त्याचा देशातून परतीचा प्रवास सुरू होतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत त्याने पूर्णपणे माघार घेतलेली असते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment