---Advertisement---

खूषखबर! यंदा दहा दिवस आधी मॉन्सून होणार सक्रिय? हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

---Advertisement---

जळगाव : या वर्षी दीड महिन्याहून अधिक कालावधीपर्यंत उष्णतेचा चढता पारा होता. याचा परिणाम वातावरणावर झाला असून यंदा आठ ते दहा दिवस आधीच मॉन्सूनचे आगमन होणार आहे. १३ मेपर्यंत मॉन्सून अंदमान-निकोबार बेटावर दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.

अंदमान निकोबार बेटावर १८ ते २२ मेच्या कालावधीत दरवर्षी मॉन्सून दाखल होतो. मात्र यंदा तो दहा दिवस आधी दाखल होत आहे. त्या पद्धतीच्या नैसर्गिक हालचालींना सुरुवातही झाली आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. मॉन्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील पाच ते सात दिवसात तो केरळमध्ये सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उष्म्याने लाहीलाही होत असलेल्या नागरिकांसाठी ही समाधानाची गोष्ट मानली जात आहे.

पावसामुळे तापमानात घट

गेल्या तीन दिवसांपासून सलग वरुण राजा शहरासह जिल्ह्यात हजेरी लावत आहे वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे केळीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. वादळात अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक गावांमधील रस्त्यांची दयनीय अवस्वा झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्यातील उष्म्यावे वातावरण झपाट्याने घसरले आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे गारवा होता. अवकाळी पावसामुळे तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विजेचा लपंडाव

गेल्या तीन दिवसांपासून शहरासह परिसरात विजेची ये-जा सुरू आहे. तासन्‌तास लाईट गुल होत असल्याने दैनंदिन कामात अनेकांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी वादळात वृक्ष कोलमडत्याने विद्युत वाहिन्या प्रभावित झाल्या. त्यामुळे वीज सप्लाय बंद झाला. हे काम गतीने करून उर्वरित भागात वीज सप्लाय सुरळीत करावा, असा सुरु स्थानिकडून होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment